![]() |
शोध पत्रकार निरंजन टकले मार्गदर्शन करताना सोबत अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे, माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. महावीर अक्कोळे व डॉ. अजित बिरनाळे |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
जयसिंगपूर - कुठल्याही अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्राने उभे ठाकून लढले पाहिजे आणि छ. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले,डॉ. आंबेडकर, शाहू महाराज यांनी घालून दिलेल्या परंपरेला धरून वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात शोधपत्रकार निरंजन टकले यांनी केले.
जयसिंगपूर कॉलेज, स्थानिक समिती, अनेकान्त एज्यू सोसायटी आणि अक्कोळे कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. ज्ञान-विज्ञानाची तंत्रज्ञानाची इतिहासाची, कर्तृत्वाची जी काही गुंतवणूक करायची आहे ती फक्त तरुण पिढी मध्येच लक्ष घालून केली पाहिजे असे आग्रही प्रतिपादन यांनी केले. शिक्षणाबद्दल संपूर्ण अनादर असलेली मंडळे जे शैक्षणिक धोरण आखतात तेव्हा त्याला प्रतिकार केल्याशिवाय समाजात सकारात्मक बदल घडणे अशक्य आहे असे सांगून इतिहासातील व वर्तमानातील अनेक उदाहरणे देत श्रोत्यांना त्यांनी एक तासाहून जास्त वेळ खिळवून ठेवले.
डॉ. सुभाष अडदंडे यांच्या हस्ते श्री. टकले यांचा सत्कार झाल्यावर प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.स्वागत व प्रास्ताविक डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले. तर डॉ.अजित बिरनाळे यांनी आभार मानले. या व्याख्यानास खासदार राजू शेट्टीसह श्रोता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विशेष वैशिष्ट्य : माजी खासदार राजू शेट्टी या व्याख्यानास एक श्रोता म्हणून उपस्थित होते. आयोजकांनी आग्रह करूनही त्यांनी समोरुन श्रोत्यांच्या रांगेत बसूनच व्याख्यान ऐकले. याचा खास उल्लेख वक्ते निरंजन टक्के यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा