![]() |
हातकणंगले पंचायत समितीतील अभियंता लाच घेताना रंगेहाथ पकडले |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : जिल्ह्यातील हातकणंगले पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश अशोक सुतार (वय वर्ष ३३) याला १०,००० रुपयेची लाच स्विकारताना ॲन्टी करप्शन ब्यूरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
अधिकृत सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या आईस रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत मंजूर लाभाच्या उर्वरित दोन टप्प्यांचे पैसे जारी करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, १३,००० रुपयांच्या मागणीचा तपास करण्यात आला. पडताळणीत १०,००० रुपयांवर तडजोड केल्याचे निष्पन्न झाले. सापळा रचून अभियंता सुतार यांना पंच व साक्षीदारांच्या उपस्थितीत अटक करण्यात आली.गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई ॲन्टी करप्शन ब्यूरो पुणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा