Breaking

बुधवार, २९ जानेवारी, २०२५

*जयसिंगपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने निबंध स्पर्धा व मतदार जनजागृती रॅली संपन्न*


कॉलेजमधून जनजागृती रॅलीला सुरुवात प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व कार्यक्रम अधिकारी 


*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जयसिंगपूर शहरात २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा व मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.

     प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली मतदार जनजागृती रॅलीला कॉलेजमधून प्रारंभ झाला. सदर रॅली शिरोळ-वाडी रोड मार्गे -क्रांती चौक - गांधी चौक व पुन्हा क्रांती चौकात या मतदार जनजागृती रॅलीचे समापन झाले. 

निबंध स्पर्धा व मतदान जनजागृती रॅली


       या रॅलीत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती करणारे हातामध्ये बोर्ड, मतदारांना जागृती करणाऱ्या  घोषणा व चौका चौकात मतदान विषयक प्रबोधनात्मक भाषणे या परिपूर्ण वैशिष्ट्यानी सदर रॅली संपन्न झाली. या रॅलीस उपप्राचार्य प्रा.डॉ. मनीषा काळे, प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. भारत आलदर व पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांचे सहकार्य लाभले.

        या रॅलीत कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने, डॉ. खंडेराव खळदकर,प्रा. मुकुंद पारीशवाड,प्रा. बागवान, प्रा. पाटील मॅडम. व प्रा.एन.एस.एस.प्रतिनिधी कु.रोहन लाले व सीनियर व ज्युनिअर विभागातील असंख्य राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा