![]() |
सदिच्छा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रसिद्ध निवेदक किरण पाटील, अध्यक्षस्थानी अशोक शिरगुप्पे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,डॉ. महावीर बुरसे, प्रा. सुनील चौगुले व प्रा. बाळासाहेब पाटील |
*प्रा.सौ. अंजना चावरे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : बारावीचे वर्ष हे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष आहे. जिद्दीने अभ्यास करून आपले व्यक्तिमत्व सिद्ध करा, स्पर्धा ही स्वतःबरोबर असावी असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रसिद्ध निवेदक मा.किरण पाटील यांनी इयत्ता बारावी आर्ट्स व कॉमर्स विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मा.अशोक शिरगुप्पे उपस्थित होते.
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना मा. अशोक शिरगुप्पे म्हणाले, जीवनाच्या उन्हामध्ये हे जयसिंगपूर कॉलेज नेहमी तुम्हाला हिरवळीसारखे ज्ञानरूपी सिंचन करीत राहील. यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजशी नाळ जोडली पाहिजे.या सदिच्छा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरणेचा नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे.
याप्रसंगी भूगोल विषयाचे प्राध्यापक व पर्यवेक्षक डॉ.महावीर बुरसे लिखित पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षास जल अर्पण करून झाली. सदिच्छा समारंभ प्रसंगी दिशा वाघमारे, भक्ती मुळीक, स्वरूपा पाटील, तन्मय कोळी, शिवांजली जावळे यांनी आपली प्रेरक व अनुभवी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त करून उच्च शिक्षण घेण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयाची दारे तुमच्यासाठी सदैव खुली असल्याचे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. एम.जे. बुरसे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.अंजना चावरे यांनी करून दिला. तरी या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.विशाल बडबडे यांनी केले व बोर्ड परीक्षेसाठी प्रतिज्ञा देऊन समारंभ चे आभार प्रा.एस.डी.चौगुले यांनी व्यक्त केले. या
कार्यक्रमासाठी स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे , सचिव डॉ. महावीर अक्कोळे व अन्य सदस्य यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम प्रसंगी सर्व प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा