![]() |
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ. सुरत मांजरे मार्गदर्शन व शुभेच्छा देताना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : देशभरात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीने वातावरणात गोडवा आणि आनंद भरला आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करताच हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात या सणाच्या माध्यमातून दर्शवली जाते. तसेच मकर संक्रांत हा परंपरा, एकता आणि निसर्गाशी जोडणारा सण म्हणून ओळखला जातो असे मत प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर तिळगुळ वाटप कार्यक्रमात जयसिंगपूर कॉलेजच्या विशाल प्रांगणात व्यक्त केला.
याप्रसंगी भूगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.टी.जी.घाटगे यांनी मकर संक्रांतीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून या दिवशी तिळगुळाचे खास पदार्थ तयार केले जातात. महाराष्ट्रात ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ हा संदेश देत लोक नाती दृढ करतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान, पतंग उडवणे, दानधर्म आणि सनईचे मंगल सूर या सणाच्या उत्सवाला अधिक रंगतदार बनवतात. तसेच १४ जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून का साजरा केला जातो याचे विवेचन याप्रसंगी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उप प्राचार्य डॉ.एम. व्ही. काळे,प्रा.डॉ. व्ही. व्ही. चौगुले, डॉ.आर.एस.नकाते यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी तिळगुळाचे वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा