![]() |
माजी प्राचार्य व प्रख्यात साहित्यक डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर :- जयसिंगपूर कॉलेजच्या प्राचार्य पदावर व अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलवर दीर्घकाळ काम केलेले प्रख्यात साहित्यिक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक स्व. प्राचार्य डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गतवर्षी चालू झालेली व्याख्यानमाला या वर्षी १८ व १९ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता जयसिंगपूर कॉलेजमध्ये होईल अशी माहिती स्थानिक समितीचे अध्यक्ष, डॉ. सुभाष अडदंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. १९ जानेवारी हा प्राचार्य, डॉ. अक्कोळेंचा स्मृतीदिन आहे.
यावर्षी प्रख्यात शोधपत्रकार निरंजन टकले हे 'मुल्यविहीन राजकारण आणि लोकशाही पुढचे धोके' या विषयावर शनिवार दिनांक १८ जानेवारी तर उच्च न्यायालयातील वकील व नागरी हक्क आणि संविधान विश्लेषक ॲड.असीम सरोदे हे 'न्याय व्यवस्थेची पडझड लोकशाहीकरण व संविधान' या विषयावर रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी व्याख्यान देणार आहेत असे व्याख्याता निवड समितीचे प्रमुख प्राचार्य, डॉ. राजेंद्र कुंभार यांनी सांगितले.
प्राचार्य, डॉ.सुरज मांजरे यांनी जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, इचलकरंजी व सांगली परिसरातील जाणकार- जिज्ञासू श्रोत्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या व्याख्यानांचा पुरेपुर लाभ घ्यावा असे आवाहन केले. ही व्याख्यानमाला दरवर्षी याच पध्दतीने नामवंत वक्त्यांना आणून निरंतर चालू राहील असे स्थानिक समिती सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी अक्कोळे कुटुंबियाच्या वतीने सांगितले.ॲड. आदिनाथ नरदे, प्रा. आप्पासाहेब भगाटे, श्री. बाळासाहेब इंगळे व अन्य स्थानिक समिती सदस्य उपस्थित होते.
तरी रसिक श्रोत्यांनी या वास्तव व वैचारिक मेजवानीचा आनंद घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा