![]() |
तेज रोलर स्केटिंग अकॅडमी केडीएम चे राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेते खेळाडू व प्रशिक्षक तेजस पाटील |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : दिनांक ११ व १२ जानेवारी,२०२५ रोजी खोपोली मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर ॲथलेटिक्स स्केटिंग स्पर्धेमध्ये जयसिंगपूरचे तेज रोलर स्केटिंग अकॅडमीचे 14 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही स्पर्धा अहमदाबाद, गुजरात येथे होणार आहे.
खोपोली येथील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एकूण १७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत तेज रोलर स्केटिंग च्या विद्यार्थ्यांनी कास्यपदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जयसिंगपूर मधून या स्पर्धेत पात्र होणारे हे प्रथमच विद्यार्थी आहेत.. या स्पर्धेमध्ये सर्वात लहान खेळाडू जिजा वायचळ(वय 4 वर्षे) हिने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत सर्व प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली .
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे -जिजा वायचळ,रुद्र काईत, अमेय पाटील,आराध्य पाटील,काव्या कुंभार, सारा शाह,श्लोक कोळी,अनुज मगदूम, संचित मोरे,हर्षवर्धन कोळी, अक्षत खामकर, प्रणील शायजू,वेदांत वासुदेव व आस्था बाळगोंडा पाटील
या स्पर्धेचे आयोजन रोलर ॲथलेटिक्स असोसिएशन महाराष्ट्रचे सेक्रेटरी अमोल साठे यांनी केले. तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विशाल देसाई व सुहास कारेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
तसेच या सर्व विद्यार्थ्यांना आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील, माजी नगरसेवक राहुल बंडगर, दादासो पाटील चिंचवडकर व सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यात आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक तेजस पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा