![]() |
प्राचार्य डॉ.सुरेश शेजाळ , डॉ.बी. सूर्यनारायण, प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर व अन्य मान्यवर |
प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
जयसिंगपूर : येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बँकिंग क्षेत्र" या विषयावर आधारित भित्तीपत्रक लेखन स्पर्धेचे आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश एस. शेजाळ यांनी उदघाटन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनींना बँकिंग क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "बँकिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असून युवा पिढीने रोजगार मिळविण्यासाठी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत." असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांनी कौशल्ये आधारित शिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे दुसरे अतिथी प्रा.डॉ.बी.सूर्यनारायण यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व आणि परिणामाविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.विकास एस. मिणचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील कु.संगीता जाधव, आम्रपाली डोणे, सीमा पाटील व इतर विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तर प्रा. प्रविण नडगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.के.रावळ, प्रा.डॉ.किशोर चंदनशिवे, प्रा.अनुजा घोरपडे, एन.एस.एस.चे प्रमुख प्रा.डॉ.पी.एस.वाघमारे, आय.क्यु.ए.सी.चे प्रमुख प्रा.डॉ.यु.ए.पाटील, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, आणि पालक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा