![]() |
डॉ. किरण पाटील यांचा वाढदिवस वृक्षारोपणाच्या माध्यमातून साजरा याप्रसंगी डॉ. महावीर अक्कोळे व डॉ. सुरत मांजरे |
जयसिंगपूर : येथील प्रसिद्ध धन्वंतरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ. किरण पाटील यांनी आपला ५६ वा वाढदिवस विविध जातीच्या फळांचे रोपण करून पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने जयसिंगपूर कॉलेज कॅम्पस मध्ये साजरा केला. वयाच्या ५६ व्या वर्षी पदार्पण करताना त्यांनी आपल्या मित्रासमवेत ५६ वृक्षांचे रोपण करून साजरा केला आहे. या उपक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, त्यांचा मित्रपरिवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पाटील यांनी गेल्या १५ वर्षापासून वाढदिवस हा आपल्या मित्राबरोबर पण अनोख्या पद्धतीने अर्थात वृक्षारोपण करून साजरा करण्याचा निश्चय केला. गेल्या १५ वर्षात डॉ. पाटील यांनी वाढदिवसाचे जे वर्ष असेल तेवढ्या संख्येच्या झाडांचे वृक्षारोपण जयसिंगपूर कॉलेज कॅम्पस मध्ये केलेले आहे. या नाविन्यपूर्ण व कृतिशील उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आजतागायत त्यांनी जवळपास ६०० पेक्षा अधिक जातीच्या वृक्षांचे रोपण केले आहे. तसेच त्याचा संवर्धन होईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत.डॉ. किरण पाटील हे खऱ्या अर्थाने वृक्षप्रेमी वा वृक्षमित्र आहेत हे स्पष्ट होत आहे. तसेच त्यांनी कोरोना महामारी, महापूर व व अन्य बिकट परिस्थितीत समाजाला साथ देण्याचे काम आपल्या कामाच्या माध्यमातून केले आहे. यासाठी त्यांचे प्रेरणास्थान व गुरुबंधू डॉ. महावीर अक्कोळे असल्याचे ही ते म्हणाले.
जय हिंद न्यूज नेटवर्क शी बोलताना ते म्हणाले, माझा हा उपक्रम पर्यावरण समृद्धी व देशासाठी आहे. हा उपक्रम सातत्यपूर्ण व अखंडितपणे चालू ठेवण्याचा माझा मानस आहे. इतर घटकांनी ही अशा पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले.
जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने डॉ. किरण पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा l
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा