![]() |
उदगाव येथे एका तरुणाचा खून |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : उदगाव ता. शिरोळ येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर खोत पेट्रोल पंपालगत हॉटेल समृद्धीसमोर जुन्या वादातून विपुल प्रमोद चौगुले (वय वर्ष २० रा. जैन बस्ती जवळ उदगाव) याचा चाकूने १३ वार करून खून केला. ही घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या खून प्रकरणी संशयित आरोपी अनिकेत मोरे व नागेश जाधव दोघे रा. बेघर वसाहत यांना जयसिंगपूर पोलिसांनी सांगली आकाशवाणी जवळ सापळा रचून शिताफिने अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू हस्तगत केला आहे. या खुनाच्या घटनेने उदगावसह परिसरात खळबळ माजली आहे.
घटनास्थळी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळुंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला. एकच्या सुमारास खून झाल्यानंतर मयत चौगुले याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे घोषित केले.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कदम करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा