![]() |
विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. प्रभाकर माने, अध्यक्षस्थानी विजय खवाटे, डॉ. संदीप रावळ, डॉ. पंडित वाघमारे, प्रा. परशुराम माने व प्रा.सौ. पुनम बरगाले |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : डिजिटल कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज असून यामुळे भारतात नव्हे तर जागतिक पटलावर नोकरीच्या नवीन संधी खुल्या होत आहेत. योग्य प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञानाची ओळख व सततचा सराव यामुळे युवकांना स्वतःला स्पर्धेत टिकवणे शक्य आहे. यामुळे युवकांनी डिजिटल कौशल्य आत्मसात करणे ही नव रोजगार निर्मितीचे आधुनिक साधन असल्याबाबतचे प्रतिपादन जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर चे प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी कोथळी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी माजी सरपंच विजय खवाटे व ग्रामपंचायत सदस्य शितल कांबळे उपस्थित होते.
डॉ. माने पुढे म्हणाले, एन.एन.एस म्हणजे विद्यार्थ्यांना विचार प्रवण करून कृतिशील कार्यासाठी सक्षम करणारी राष्ट्रीय पातळीवरील सेवाभावी संघटना होय. विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक जबाबदारी व संवेदनशीलता निर्माण करून एक सच्चा भारतीय निर्माण करण्याची एक सजग प्रक्रिया असल्याचेही ते म्हणाले.
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना माजी सरपंच विजय खवाटे म्हणाले, एन.एस.एस च्या माध्यमातून आमच्या गावात विविध सामाजिक, आरोग्य विषयक, सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्य रॅलीच्या माध्यमातून होत आहे. त्यापैकी चा एक उत्तम उपक्रम म्हणजे घरफाळा व पाणीपट्टी भरण्यासंदर्भात प्रबोधन करण्याचं काम होय. ती पुढे म्हणाले, एनएसएस म्हणजे सामाजिक कार्यकर्ते निर्माण करणारी एक उत्तम संस्थात्मक व्यवस्था आहे.
कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. पंडित वाघमारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. संदीप रावळ यांनी करीन दिला.आभार डॉ. परशुराम माने यांनी मानले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौ.पुनम बरगाले यांनी केले.
या कार्यक्रमास प्राचार्य प्रा.डॉ. विकास मिणचेकर यांची प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शीतल कांबळे, रोहन लाले व वीरेंद्र कडाळे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा