Breaking

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

*अनेकांत स्कूलमध्ये विज्ञान प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन*

 

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अनेकांत स्कूलमध्ये
                सायन्स फेअर २०२५ - २०२६ कार्यक्रम


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी 'विज्ञान प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन' आयोजित केले आहे. सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये जयसिंगपूर मधील विविध शाळांचा देखील सहभाग आहे. दुपारी १२.३० नंतर हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.तरी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांसह या प्रदर्शनास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. सर्व शाळांनी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा