Breaking

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

*समूह नृत्य स्पर्धेत जय विजय विद्या मंदिरचा प्रथम क्रमांक ; पुन्हा एकदा गरूड भरारी*

 

समूह नाट्य स्पर्धेत जय विजय विद्यामंदिर चा प्रथम क्रमांक


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : येथील नाट्य शुभांगी या प्रथितयश संस्थे मार्फत घेण्यात आलेल्या समूह नृत्य स्पर्धेत जयसिंगपूरच्या जयविजय विद्यामंदिरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत इ.४ वी ते ७वी च्या मुलींनी उत्कृष्ट सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.ही स्पर्धा शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी, २०२५ रोजी सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आली होती.

   सदर स्पर्धेत अनेक शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी जय विजय शाळेच्या शिक्षिका आसमा शेख यांनी कोरीओग्राफी केली व त्यांना सहाय्यक म्हणून शिक्षिका स्मिता पाटील यांनी विशेष सहकार्य केले. 

     या कामी डॉ. जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजयराज मगदूम व व्हा. चेअरमन डॉ.सोनाली मगदूम यांचे विशेष मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य लाभले. संस्था प्रशासक  रायण्णावर सर  व मुख्याध्यापक विजयकुमार माने यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

       यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा