Breaking

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

*पीएच.डी. पदवी प्रक्रियेची पूर्वतयारी ही संशोधक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण संशोधन कार्यास दिशादर्शक : डॉ. संदीप रावळ*


मार्गदर्शन करताना डॉ. संदीप रावळ, अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. विजयमाला चौगुले व डॉ. प्रभाकर माने


*प्रा.ज्योती पोरे : विशेष प्रतिनिधी *


जयसिंगपूर : भविष्यात संशोधन कार्याला योग्य दिशा देणे, पीएच.डी. विषयी भीती दूर करणे, संशोधन वृत्ती निर्माण करणे व गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य गतिशील करण्यासाठी सर्व महाविद्यालयानी 'पीएच.डी. पदवी प्रवेश प्रक्रिया पूर्वतयारी' अशा विषयावर व्याख्यान व कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे.ते जयसिंगपूर येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये आयोजित केलेल्या 'पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया व संशोधन कार्य' या विषयावर मार्गदर्शन करताना श्रीमती जी के जी घोडावत कन्या महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संदीप रावळ प्रमुख पाहुणे व साधन व्यक्ती म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उप प्राचार्य डॉ. विजयमाला चौगुले उपस्थित होते.

      डॉ. रावळ यांनी पीएच.डी. पदवी परीक्षेची पूर्वतयारी बाबत मौलिक व सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना उपकृत केले. पीएच.डी. व संशोधन कार्याच्या अनेक बाबीवर प्रकाश टाकला.त्याचबरोबर संशोधन कार्य सिद्धीस नेण्यासाठी काही महत्त्वांच्या पैलूंचा उलघडा आपल्या भाषणात केला. 


      अध्यक्ष स्थानावर बोलताना उपप्राचार्य प्रा.डॉ. सौ.विजयमाला चौगुले म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीस चालना देण्यासाठी व गुणवत्तापूर्ण संशोधक विद्यार्थी निर्माण करण्यासाठी असा उपक्रम विद्यार्थी केंद्रीत असल्याबाबतचा सुतोवाच केला.

     अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.मेहबूब मुजावर यांनी परिचय करून दिला.आभार डॉ. वंदना देवकर यांनी मानले. तर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. विश्रांती चव्हाण यांनी केले.

     या कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा, सहकार्य व मार्गदर्शन लाभले. 

      विद्यार्थी वर्गाकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा