Breaking

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये 'भारतीय संविधानाचा परिचय' या विषयावर परीक्षा संपन्न*


संविधान परिचय या परीक्षेला सामोरे जाताना 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवीवर्ष हे अखंड भारतात विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या राज्यशास्त्र विभागाने "भारतीय संविधानाचा परिचय "या विषयावर  सोमवार दि.२४ फेब्रुवारी,२०२५ रोजी परीक्षा पार पडली. या परीक्षेचा आयोजन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले.

      सदर परीक्षा ही १०० गुणाची  आयोजित केली होती. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा तसेच देशाचे जबाबदार,सुजाण व नीतिमान नागरिक बनावे या उद्देशाने सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.सदर परीक्षेला कॉलेजच्या ज्युनियर व सीनियर विभागातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. परीक्षेमध्ये अनुक्रमे जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना  योग्य ते बक्षीस व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

      सदर परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे विशेष सहकार्य व बहुमोल मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य प्रो. डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. डॉ. प्रभाकर माने, प्रा. सुरज चौगुले ,प्रा. राजाराम कांबळे, प्रा. एम.एस. बागवान व प्रा. डॉ. राजेंद्र कोळी यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा