Breaking

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

*विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणेसाठी विद्यार्थ्याने राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श जपावा : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के*

 

समारोप समारंभ प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डी टी शिर्के, प्र कुलगुरु डॉ.पी.एस.पाटील, रिजनल डायरेक्टर अजय शिंदे, सुमंतकुमार यादव याप्रसंगी कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे व संचालक डॉ. टी. एम. चौगले


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


कोल्हापूर  : राष्ट्रीय एकता, एकात्मता, सौहार्दपूर्ण संबंध आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा समारोप सोहळा विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देशभरातील १२ राज्यातील २०० पेक्षा अधिक युवकांनी व १४ संघ व्यवस्थापकांनी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सांस्कृतिक व पारंपारिक कलेच्या माध्यमातून जनमानसावर ठसा उमटविला. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. या समारोप सोहळ्यात प्रमुख उपस्थितीमध्ये  प्र.कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे रीजनल डायरेक्टर डॉ. अजय शिंदे, युथ ऑफिसर सुमंत कुमार यादव व संचालक डॉ.टी. एम.चौगले उपस्थित होते.

       समारोपप्रसंगी बोलताना डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले "देशाच्या विकासासाठी युवकांनी एकतेचा आदर्श जपावा. अखंड देशाच्या कल्याणासाठी अर्थात विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात या माध्यमातून उतरवावे असे सांगितले. प्र कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांनी राष्ट्रीय एकतेचे महत्व विशद करीत युवक आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. 

       सर्व मान्यवरांच्या हस्ते सहभागी युवकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. याप्रसंगी पारंपारिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, पोस्टर मेकिंग/निर्मिती, रस्सीखेच, उत्कृष्ट ग्रुप व गटचर्चा या स्पर्धेत यशस्वी झालेल्या राज्यांना शील्ड व प्रमाणपत्र देऊन  गौरव करण्यात आला. सदर शिबिरात देशातील विविध प्रांतांतील युवकांनी एकत्र येत भाषिक, शांती, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. पारंपरिक नृत्य, संगीत आणि विविध कला सादरीकरणांमधून भारताच्या विविधतेतील एकता अधोरेखित करण्यात आली.

     याप्रसंगी केरळचे, तामिळनाडू, कर्नाटक,मध्यप्रदेश व महाराष्ट्राचे संघनायक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या या राष्ट्रीय एकात्मता शिबिराबाबत गौरव उद्गार काढले.सहभागी युवकांनीही शिबिराच्या अनुभवाबद्दल आनंद व्यक्त केला. हा उपक्रम आपल्याला नवी ऊर्जा व प्रेरणा देणारा ठरला असल्याबाबतचे मत व्यक्त केले. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले.

        समारोप सोहळ्याच्या अखेरीस राष्ट्रगीताने,जय भवानी जय शिवाजी व वंदे मातरम च्या जयघोषात राष्ट्रीय एकतेचा संदेश देत शिबिराची सांगता झाली.

      या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.अजय शिंदे यांनी केले. सुमंतकुमार यादव यांनी अहवाल वाचन केले.तर डॉ. टी.एम. चौगले यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली शिंदे यांनी केले.

      सरतेशेवटी शिबिर समारोपाच्या प्रसंगी सात दिवसीय जोडलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या अतुट नात्यांमधून विद्यार्थी व संघनायकाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा