![]() |
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. जयवंत इंगळे ,डॉ. महावीर अक्कोळे, अशोक शिरगुप्पे, प्राचार्य डॉ.मांजरे व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : सन २०४७ पर्यंत विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ हा उपयुक्त,फलदायी व मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ. जयवंत इंगळे यांनी केले.
जयसिंगपूर कॉलेजमधील अर्थशास्त्र विभाग आयोजित अंदाजपत्रक २०२५ या एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बीजभाषक म्हणून बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे अध्यक्षस्थानी होते. अशोक शिरगुप्पे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डॉ. इंगळे म्हणाले, या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न व उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याने साहजिकच उपभोग्य पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. परिणाम सुरू देशाच्या विकासाला बळ मिळेल. तसेच सरकारने विविध क्षेत्राला स्पर्श करणारी किंबहुना विकासाला दिशा देणारी व्युहरचना-धोरणे व त्यासाठी केलेली भरीव तरतूद ही विकसित भारताच्या दिशेने नांदी दिसून येते.
अध्यक्षीय भाष्य करताना डॉ. अक्कोळे म्हणाले, अंदाजपत्रकातील सर्व बाबी या सर्वसामान्य नागरिक, शेती व शेतकरी यांना केंद्रस्थानी मानून सादर केले पाहिजे. व्यवस्थेतील एकाच घटकाचे चांगभलं करणार नसावे असे मत व्यक्त केले.
प्रथम सत्रात डॉ. मनोहर कोरे यांनी अंदाजपत्रकाच्या दोन्ही बाजूने समतोल मांडणी करीत अंदाजपत्रकाचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी अशोक शिरगुप्पे होते.
द्वितीय सत्रात सीएस CS संदीप शेडबाळे यांनी अंदाजपत्रकीय उपलब्ध आकडेवारीच्या आधारावर अंदाजपत्रकाचा दोन्ही बाजूनी अंदाजपत्रकीय वास्तव विवेचन केले. अध्यक्षस्थानी उप प्राचार्य डॉ. विजयमाला चौगुले होत्या.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रभाकर माने यांनी केला.डॉ. वंदना देवकर यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. विश्रांती चव्हाण यांनी केला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस.आर.नकाते, आय क्यू यु सी समन्वयक डॉ. तुषार घाटगे, प्रा. संदीप रावळ, प्रा. आबासाहेब जाधव,डॉ. खंडेराव खळदकर,प्रा. डॉ. सुजाता पाटील, अन्य प्राध्यापक गण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन अर्थशास्त्र विभागाच्या वतीने प्रा. मेहबूब मुजावर, प्रा.ज्योती पोरे, प्रणाली लोहार, नेहा जाधव, करिष्मा ढाले, करीना ढाले व एम ए.भाग १ व २ च्या सर्व विद्यार्थ्यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा