Breaking

रविवार, १६ मार्च, २०२५

*धरणगुत्तीच्या डॉ. सुनील पाटील यांच्या 'पुस्तकाच्या घरास' जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट*


कविता सगर प्रकाशन संस्थेचे
मालक व संपादक डॉ. सुनील पाटील यांचे पुस्तकाचे घर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजचे  सामाजिक शास्त्र मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १० मार्च,२०२५ रोजी डॉ. सुनील पाटील यांच्या मौजे धरणगुत्ती येथील पुस्तकांच्या घरास अभ्यास भेट उपक्रमांतर्गत सदिच्छा भेट देण्यात आली.

     पश्चिम महाराष्ट्रातील कविता सागर या लोकप्रिय प्रकाशन संस्थेचे मालक,संपादक व 'पुस्तकाचे घर' या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक डॉ. सुनील पाटील यांच्या पुस्तकाचे घरास विद्यार्थ्यांनी भेट दिली. याप्रसंगी डॉ. सुनील पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित घटकांचे स्वागत केले. पाटील कुटुंबीयांनी घरातील बेडरूम, किचन रूम, हॉल व अन्य भागाचा वापर शेकडो पुस्तके ठेवणे व वाचण्यासाठी केला आहे. सदर उपक्रमाचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेऊन प्रमाणपत्र बहाल केले आहे. सदर विद्यार्थी हे पुस्तकांचे घर पाहून अत्यंत प्रभावित व प्रोत्साहित झाले याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केली.

   सामाजिक शास्त्र मंडळाचे समन्वयक प्रा. डॉ. खंडेराव खळदकर यांनी प्रास्ताविके च्या माध्यमातून पुस्तकाच्या घरास भेट देण्याचा उद्देश, व सर्वांगीण विकासामध्ये पुस्तकांचे असलेले महत्त्व स्पष्ट केले. 

    डॉ. सुनील पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण व्हावी अर्थात वाचन संस्कृती जपणे, विद्यार्थ्यांची व समाजातील प्रत्येक घटकांची वैचारिक प्रगल्भता समृद्ध व्हावी, त्यातून व्यक्तीचा, समाजाचा व देशाचा विकास व्हावा या उदात्त भावनेतून मी स्वतः पासून स्वतःच्याच घरात पुस्तकाचा संग्रह करायला व ती मागेल त्या व्यक्तीस वाचण्यास देण्यास सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले, शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन घरी स्वतःचे ग्रंथालय सुरू करण्याचे आवाहन केले.

  कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करून पुस्तक वाचनामुळे श्री व सौ. पाटील यांचा चिरंजीव अर्थात प्रिन्सचे पुस्तकाचे वाचन,पुस्तकाचे परीक्षण व लेखन कौशल्य संपादित कसे केले व त्याला मिळालेले विविध पुरस्कार, तसेच या कामी त्यांच्या आई-वडिलांचे मिळालेले येतोचित मार्गदर्शन व संस्कार याविषयी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. 

     अभ्यास भेट उपक्रमांतर्गत शेवटी इतिहास विभागाचे प्रा. सुरज चौगुले यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास  उप-प्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, प्रा. डॉ. राजेंद्र कोळी, प्रा. एम. एस. बागवान ,प्रा. आर. के.कांबळे, गणेश कुरळे व एनएसएस प्रतिनिधी रोहन लाले व विक्रम कडाळे उपस्थित होते.

   प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व शेखर पाटील यांचे मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा