Breaking

सोमवार, १७ मार्च, २०२५

*जयप्रभा इंग्लिश स्कूलमध्ये देश विदेशातील दुर्मिळ टपाल तिकिट प्रदर्शनाचे उत्तम आयोजन*


गभरातील कर्तुत्वान महिलांचे दुर्मिळ टपाल तिकिटाचे प्रदर्शन


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवार, दिनांक १५ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन व प्रिन्स सुनील पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देश विदेशातील कर्तुत्वान महिलांच्या दुर्मीळ टपाल तिकिट प्रदर्शनाचे आयोजन केले होते. 

     यावेळी जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थी कु प्रिन्स सुनील पाटील याने आई-वडिलांच्या मदतीने संकलित केलेल्या विविध दुर्मिळ टपाल तिकिटांचे प्रदर्शन मांडून उत्तमरीत्या सादरीकरण करण्यात आले. जगभरात विविध क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या  महिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकिटांचे प्रकाशन केले होते अशा दुर्मीळ टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी भारतातील विशेष करून जिजामाता, अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी व अन्य महिलांच्या दुर्मिळ टपाल तिकिटांचा समावेश होता.

      हे प्रदर्शन पाहण्यासाठी जयसिंगपूर परिसरातील अनेक शाळांनी भेटी दिल्या. हे प्रदर्शन पाहून अनेक विद्यार्थी भारावून गेले होते. उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले. यावेळी जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने  व रोहन लाले यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

       या प्रदर्शनास  जॉइंट्स ग्रुप ऑफ सहेली, जयसिंगपूरचे सौ.माधुरी चौगुले व त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.

   जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक मा.राहुल नौकुडकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या उपक्रमाचे उत्तम आयोजन स्कूलच्या माध्यमातून करण्यात आले.

     या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा