![]() |
मौजे धरणगुत्ती येथे पंचगंगा नदी घाट स्वच्छता करताना एन.एस.एस स्वयंसेवक विद्यार्थी |
*प्रा. विश्रांती चव्हाण : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : मौजे धरणगुत्ती येथील पंचगंगा नदीच्या घाटावरील साचलेली माती व गाळ हटवण्याचे काम जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केले आहे.धरणगुत्ती येथे सुरू असलेल्या विशेष श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून मंगळवार दिनांक ५ मार्च, २०२५ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाच्या सूचनेनुसार ही मोहीम हाती घेण्यात आली असून नदीकाठ स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे.
पावसामुळे पंचगंगा नदीच्या घाटांवर मोठ्या प्रमाणात गाळ आणि माती साचली होती. त्यामुळे घाटांवरील सौंदर्य आणि स्वच्छता बाधित झाली होती. तसेच स्थानिक नागरिकांना ये -जा करण्यास त्रास होत असल्याने राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कक्षाने स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला.
ग्रामपंचायत व एन एस एस ने सदर नदी घाट परिसर स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे. तसेच, भविष्यात गाळ साचण्याची समस्या टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या कामी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी. एम चौगले, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, सरपंच विजया कांबळे, शेखर पाटील, ग्रामविकास अधिकारी सी.एम. केंबळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, डॉ. प्रभाकर माने, एन.एस.एस. प्रतिनिधी रोहन लाले व एन एस एस विद्यार्थ्यांनी सदर स्वच्छता उपक्रम उत्तम पद्धतीने राबविला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा