![]() |
मानव तस्करी प्रतिबंध विषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राष्ट्रीय प्रकल्प अधिकारी डॅनियल सर, मोझे सर, संदीप सर,विनायक कुलकर्णी व सी.एम. केंबळे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : मानव तस्करी ही केवळ सामाजिक समस्या नाही, तर हे एक मानवनिर्मित जागतिक गुन्हेगारी नेटवर्क आहे. मुळात अत्यंतिक दारिद्र्य व महिलाविषया असलेली असंवेदनशील मानसिकता हेच मानव तस्करीचे मूलभूत कारण असल्याचे मत मांडून या विरोधात जागतिक पटलावर कठोर कायद्यांची अंमलबजावणी आणि लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय प्रकल्प अधिकारी डॅनियल यांनी व्यक्त केले.
ते मौजे धरणगुत्ती येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराच्या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून व्यक्त केले. मुंबईस्थित ओएसिस या एनजीओच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी सी.एम. केंबळे होते.
प्रथम सत्रात प्रकल्प अधिकारी मोझे सर यांनी वास्तविक आकडेवारीच्या माध्यमातून अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (NCRB) अहवालानुसार, भारतामध्ये दरवर्षी सुमारे २०,००० लोकांची मानव तस्करी होते, त्यातील ६०% पेक्षा जास्त पीडित महिला आणि लहान मुले असतात. महाराष्ट्र हे मानव तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात प्रभावित राज्यांपैकी एक आहे. तस्करी पीडितांचे पुनर्वसन आणि मदत – पीडितांना मानसिक, शारीरिक व आर्थिक मदत मिळावी यासाठी पुनर्वसन केंद्रे अधिक सक्षम करण्याची गरज याविषयी आपली मते अधोरेखित केली.
तसेच द्वितीय सत्रात सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. संदीप यांनी प्रशासन आणि नागरिकांची भूमिका – पोलिसांनी अधिक सतर्क राहून तस्करीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले.
समारोप सत्रात अध्यक्ष स्थानावर बोलताना विनायक कुलकर्णी यांनी मानव तस्करी जनजागृती मोहिमा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर – सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि तस्करांच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रभाकर माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रथमेश कोळी,आभार डॉ. खंडेराव खळदकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.नेहा आंबी यांनी केले. प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
मानव तस्करीविरोधी लढा हा केवळ कायद्याने जिंकला जाऊ शकत नाही, तर समाजातील प्रत्येक घटकांनी यामध्ये सक्रियपणे सहभागी झाले पाहिजे असा सूर या कार्यशाळेत मांडला गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा