जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजने विभागातील विद्यार्थ्यांनी मौजे धरणगुत्ती येथे सुरू असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावातील स्मशानभूमी, स्मशानशेड व स्मशान निवारा शेड स्वच्छ करून रचनात्मक कार्याच्या माध्यमातून मानवतावादी सेवा जोपासली.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी.एम. चौगले, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, सरपंच विजया कांबळे व शेखर पाटील यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गावातील एकमेव स्मशान शेड, स्मशानभूमी व निवारा शेड स्वच्छ करून सामाजिक सेवेच्या माध्यमातून बांधिलकी जपण्याचं काम केले आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी सी.एम.केंबळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने, डॉ. खंडेराव खळदकर, एन.एस.एस. प्रतिनिधी रोहन लाले व गणेश कुरळे यांनी उत्तम पद्धतीने कार्यवाही केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा