Breaking

बुधवार, ५ मार्च, २०२५

*समाजाशी नाळ जोडणारी राष्ट्रीय यंत्रणा म्हणजे एन.एस.एस. : अँड.श्रीकांत माळकर*


एनएसएस शिबिरात मार्गदर्शन करताना ॲड.श्रीकांत माळकर, अध्यक्ष शेखर पाटील, सरपंच विजया कांबळे व प्राचार्य डॉ. सुरज मांजरे

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : सकारात्मक विचार व कार्यप्रवण वव्यक्तीच्या जवळ असणे हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे कल्याण असते. यासाठी साधना व तपश्चर्येच्या माध्यमातून जीवन मार्ग यशस्वी होऊ शकतो यासाठी विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांशी जवळीकता साधने गरजेचे असते. तसेच राष्ट्रीय सेवा योजने मधील सेवा हा शब्द मुलगामी असल्यामुळे समाजाच्या उत्थानासाठी समाजाशी नाळ जोडणारी राष्ट्रीय यंत्रणा म्हणजे एन. एस.एस. असल्याचे मत प्रेरक वक्ते अँड.श्रीकांत माळकर यांनी व्यक्त केले.

     ते  मंगळवार दि. ४ मार्च,२०२५ रोजी मौजे धरणगुत्ती येथे संपन्न झालेल्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेखर पाटील व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.

     अध्यक्ष स्थानावर बोलताना शेखर पाटील म्हणाले, प्रत्येकी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंतरंगातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करून सामर्थ्य हेच जीवन या विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झाले पाहिजे. याप्रसंगी त्यांनी माझी वसुंधरा अभियानाबाबत सुतवाच केला. 

      प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी सूत्रसंचालन केले.

       या कार्यक्रमास सरपंच मा. विजया कांबळे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील, शिवराज पवार, ग्रामविकास अधिकारी सी.एम.केंबळे, एन.एस.एस. प्रतिनिधी रोहन लाले व एन.एस.एस. प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा