Breaking

बुधवार, १९ मार्च, २०२५

राष्ट्रीय एकात्मता शिबिर (NIC) व एस.आर.डी. शिबिरात जयसिंगपूर कॉलेजचे कौतुकास्पद कार्य*

 

प्रा.डॉ.प्रभाकर माने, कु.रोहन लाले व  कु.विरेंद्र कडाळे


*प्रा.डॉ. महावीर बुरसे  : उपसंपादक*


जयसिंगपूर :   शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे  पार पडलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये जयसिंगपूर कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचा संघनायक म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. सदर शिबिरात शिवाजी विद्यापीठास पोस्टर मेकिंग व पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे यश प्राप्त झाले आहे.तसेच एन.एस.एस. स्वयंसेवक कु.रोहन लाले याने लोकनृत्य, लोककला व वादविवाद स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून यशस्वी कामगिरी केली आहे. भारत सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या या शिबिरात १४ राज्यातील विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. शिवाजी विद्यापीठास या शिबिराचे यजमान पद मिळाले होते.

      कु. वीरेंद्र कडाळे यांची मुंबई येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनी मुख्य SRD संचलनामध्ये सहभागी होऊन त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे.

     या कामी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटीलसंचालक डॉ.टी.एम.चौगले, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा