Breaking

गुरुवार, २० मार्च, २०२५

*संशोधकाचे संशोधन हे समाजोपयोगी व गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य वृद्धीसाठी असावे ; मा.पद्माकर पाटील यांचे प्रतिपादन*


राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना उद्घाटक मा. पद्माकर पाटील, अध्यक्ष अशोक शिरगुप्पे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, प्रा.डॉ. एम. व्ही.काळे व प्रा.डॉ.बी. एम.सरगर, डॉ. पी. पी.चिकोडे, डॉ. आर.डी. माने, डॉ.जी. एच. निकम व अन्य मान्यवर 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : सद्य परिस्थितीमध्ये संशोधन कार्य हे विविध अंगी असून विविध क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे विज्ञान शाखेच्या संशोधकाचे ज्ञान व संशोधन हे प्रयोगशाळा पुरते मर्यादित नसावे. जेणेकरून समाजोपयोगी व गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य वृद्धीसाठी   असले पाहिजे असे मत उद्घाटक मा.पद्माकर पाटील यांनी जयसिंगपूर कॉलेज येथे सुरू असलेल्या एक दिवशीय तिसऱ्या राष्ट्रीय कॉन्फरन्सच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी अशोक शिरगुप्पे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.

      मा.पाटील पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही संशोधनाचे कार्य सुरू ठेवले पाहिजे; जेणेकरून विविध क्षेत्रात संशोधन प्रकल्प सुरू करता येईल. याप्रसंगी प्राचार्य डॉ.मांजरे यांनी कॉलेजच्या भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेची सविस्तर माहिती दिली.

      प्रथम सत्रात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील प्रा.डॉ.ए.व्ही.घुले यांनी विज्ञान क्षेत्रातील सर्व बाबींना स्पर्श करणारी शास्त्रीय संशोधनात्मक  मांडणी विविध अंगानी केली. विशेष करून रसायनशास्त्रातील संशोधनाबाबत महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. प्रथम सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून डॉ.बी.एम.सरगर यांनी काम पाहिले. 

      द्वितीय सत्रात संजय घोडावत विद्यापीठाचे प्रा.डॉ. संभाजी पवार यांनी पदार्थ विज्ञान शाखेचे अनुषंगाने संशोधनात्मक बाबीवर भाष्य करीत समाजोपयोगी वास्तव संशोधनावर प्रकाश टाकला. प्रा.डॉ. संजय लठ्ठे यांनी द्वितीय सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून कामकाज पूर्ण केल

     सत्र समाप्तीचे प्रमुख पाहुणे व संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे होते. याप्रसंगी ते म्हणाले, जागतिक पातळीवर संशोधन कार्याला प्रचंड संधी असून त्याद्वारे संशोधकांनी जागतिक कीर्तीचे उत्तम संशोधन केले पाहिजे. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण व कल्पकतेने तयार केलेल्या पोस्टरचे कौतुक केले. उत्कृष्ट पोस्टर व सादरीकरण केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते.

     स्वागत व प्रास्ताविक डॉ.पी.पी. चिकोडे यांनी केले.आभार डॉ.आर.डी.माने यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. एस.जी.पाटील यांनी केले.  

    समन्वयक प्रा.डॉ. बी.एम.सरगर, सह-समन्वयक प्रा.डॉ.आर.डी.माने, उप प्राचार्य प्रा.डॉ.एम.व्ही.काळे, प्रमुख प्रा.डॉ.पी.पी. चिकोडे, सचिव डॉ. जी.एच.निकम, खजिनदार डॉ.आर.एस.ढबे, आय.क्यू.ई.सी प्रा.डॉ. टी.जी.घाटगे,सह समन्वयक प्रा.आर.डी.शिंदे, डीबीटी स्टार प्रमुख डॉ.एस.डी.उमडाळे व प्रा. आर.डी. तासगावकर यांनी या राष्ट्रीय कॉन्फरन्सचे उत्तम नियोजन व आयोजन केले.

      या राष्ट्रीय परिषदेस प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा