![]() |
जयप्रभा स्कूलमध्ये दुर्मिळ तिकिटांचे प्रदर्शन |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवार, दिनांक १५ मार्च रोजी सकाळी ८.०० ते ११.०० यावेळेत दुर्मीळ टपाल तिकिटांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. विद्यार्थी प्रिन्स सुनील पाटील याने आई-वडिलांच्या मदतीने संकलित केलेल्या विविध टपाल तिकिटांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. जगभरातील कर्तुत्वान व्यक्तींच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकिटांचे प्रकाशन केले होते अशा दुर्मीळ टपाल तिकिटांचे प्रदर्शनात सादरीकरण होणार आहे.
या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन,जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक राहुल नौकुडकर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा