Breaking

शनिवार, २२ मार्च, २०२५

*म्युच्युअल फंड क्षेत्र हे तरुणासाठी नाविन्यपूर्ण, सुरक्षित व आर्थिक प्रगतीचे उत्तम साधन : प्रदीप पाटील*


अग्रणी महाविद्यालय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मा. प्रदीप पाटील, शितल कदम, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, समन्वयक डॉ. एस. आर.नकाते व डॉ. व्ही. व्ही चौगुले


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  म्युच्युअल फंड क्षेत्र हे तरुणांसाठी सुरक्षित, नाविन्यपूर्ण व आर्थिक प्रगतीचे उत्तम साधन बनले असून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी सतत आर्थिक ज्ञानात भर घालून संधींचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन प्रदीप पाटील यांनी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे आज अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यशाळेत केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,प्रा.डॉ. व्ही. व्ही. चौगुले व  समन्वयक डॉ.एस.आर.नकाते उपस्थित होते.

       प्रदीप पाटील पुढे म्हणाले, म्युच्युअल फंड हे क्षेत्र केवळ गुंतवणुकीपुरते मर्यादित नसून, तरुणांसाठी करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र ठरत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार, आर्थिक साक्षरतेत वाढ आणि गुंतवणुकीचा वाढता कल यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची मोठी गरज भासत आहे.या क्षेत्रात सुरुवातीसाठी 3-5 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळते, तर अनुभव व कौशल्यानुसार पगारात मोठी वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

     रिलेशनशिप मॅनेजर, फंड मॅनेजर,सेल्स व मार्केटिंग प्रोफेशनल्स, ऑपरेशन्स व बॅक ऑफिस व अन्य प्रकारच्या मुख्य करिअर संधी उपलब्ध आहेत. B.Com, BBA, MBA Finance & B.A. Economics या क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना म्युच्युअल फंड उद्योगात उत्तम संधी उपलब्ध आहेत.

     द्वितीय सत्रात मार्गदर्शन करताना सौ. शितल कदम म्हणाल्या, आधुनिक काळात विमा क्षेत्रात लोकांचा वाढता कल पाहता विद्यार्थ्यांना करिअरच्या खूप संधी आहेत. यामध्ये विमा सल्लागार, क्लेम प्रोसेसिंग अधिकारी, अंडर रायटर व विमा विक्रेता यांमध्ये नामी संधी आहेत.

        अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले, या क्षेत्रात स्थिर आणि उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी, वित्तीय ज्ञान, संप्रेषण कौशल्ये आणि ग्राहक सेवेमध्ये पारंगत होणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात केली पाहिजे.

   कार्यक्रमाच्या सरते शेवटी  प्रश्नोत्तरे सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.

    डॉ.एस.आर.नकाते यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून प्रास्तविकेच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.  प्रा.एस.बी.डफळापूरकर यांनी आभार व्यक्त केले.डॉ.एस.जी.पाटील यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.

      प्रा.डी.एस.बामणे, प्रा.शिंदे,डॉ. के.डी.खळदकर, डॉ.आर.एस.ढबे, प्रा.एस.एस.चौगुले यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.

    या  कार्यशाळेबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा