![]() |
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड. आदिनाथ नरदे, अध्यक्षस्थानी शेखर पाटील व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : राष्ट्रीय सेवा योजना ही युवकाची खऱ्या अर्थाने राष्ट्र कल्यानासाठी सेवार्थी कार्य करणारी राष्ट्रीय संघटना आहे.ही संघटना विद्यार्थ्यांच्या सर्वकष विकासासाठी कटिबद्ध असून त्याद्वारे युवा शक्तीचा समाजसेवेकडे प्रभावी व सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू असल्याचे मत ॲड.आदिनाथ नरदे यांनी व्यक्त केले.
मौजे धरणगुत्ती येथे सोमवार दिनांक १० मार्च,२०२५ रोजी आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच शेखर पाटील व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावर बोलताना शेखर पाटील म्हणाले, या शिबिराच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी नदी घाट स्वच्छता, स्मशानभूमी, निवारा शेड, सार्वजनिक परिसर स्वच्छता व प्रबोधनात्मक रॅली या रचनात्मक कामाच्या माध्यमातून सर्वतोपरी सेवाभावी कार्य करून नवयुवकांना संदेश दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शिबिर काळात सुप्रसिद्ध लेखक सुनील पाटील यांच्या पुस्तकाच्या घराला भेट देऊन वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न केला.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी अहवाल वाचन व सूत्रसंचालन केले.कार्यक्रम अधिकारी डॉ.के.डी.खळदकर यांनी आभार व्यक्त केले.
या कामी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी.एम. चौगले, संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, सर्व पदाधिकारी व सर्व मान्यवर संचालकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास सरपंच विजया कांबळे, मनोहर माळी, रजपूत,पोलीस पाटील भानुसे, ग्रामविकास अधिकारी सी.एम.केंबळे, शिवराज पवार, व उपप्राचार्य डॉ.व्ही.व्ही. चौगुले, डॉ.एस. जी.संसुद्धी, प्रा.सुरज चौगुले,प्रा. बागवान, गणेश कुरळे, दादा पाटील, रोहन लाले, नेहा आंबी, वीरेंद्र कडाळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा