![]() |
शिवस्फूर्ती व्याख्यानमालेत पुष्प गुंफताना प्रसिद्ध वक्ते प्रा. अंजना चावरे,शिरोळ |
प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : गेली १७ दिवस शिरोळ तालुक्यामध्ये शिवस्फूर्ती व्याख्यानमाला अगदी उत्साहात संपन्न झाली. या व्याख्यानालायच्या सांगता समारंभ वेळी सौ. जयश्री पाटील यांनी द्रष्टा राजा छत्रपती शिवाजी यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. तसेच या व्याख्यानमालाचे २५ वे पुष्प गुंफताना प्रा.सौ.अंजना चावरे म्हणाल्या की, "प्रत्येक घरात शिवराय जन्माला यायचे असतील तर प्रत्येक घरात अगोदर जिजाऊ असल्या पाहिजे". असे प्रतिपादन केले. कारण छत्रपती शिवाजी महाराज 'जाणते राजे' झाले कारण त्यांच्या मागे 'जाणती आई' होती. शिरोळ मध्ये शिवस्फूर्ती व्याख्यानमालेचा एक आगळावेगळा कार्यक्रम प्रथमत:च महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. व्हिजन आयडल्स करिअर अकॅडमी, रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी, ज्येष्ठ नागरिक सेवा, राधा महिला सोशल फाउंडेशन शिरोळ, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व वनमित्र संस्था कागल यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवस्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या सांगता समारंभाचे अध्यक्षस्थानी डॉ.आप्पासाहेब पुजारी होते.
ॲड. श्रीकांत माळकर यांनी स्वागत केले. शिवाजीराव पाटील कौलवकर यांनी प्रास्ताविकेतून व्याख्यानमालेचा हेतू स्पष्ट केला.प्रा.के.एस.भोसले यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. स्वयंपरिवर्तन फाउंडेशन चे सर्वेसर्वा स्वप्नील प्रकाश माळी यांनी आपल्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.
शिवस्मृती व्याख्यानमालेच्या आयोजक संस्था व प्रमुख वक्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन येतोच सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध व्याख्याती प्रज्ञा माळकर, व माजी प्राचार्य एस एस पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत प्रा.डॉ. आप्पासाहेब पुजारी यांनी व्यक्त केले या कार्यक्रम प्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई शिवव्याख्याते ॲड.उदय मोरे, पत्रकार आप्पासाहेब चिकोडे, प्रवीण चुंडमुंगे,प्रा.मुळीक,मनोहर पवार, किरण पाटील, सुतार सर, असे बरेच प्रतिष्ठित नागरिक हजर या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा