![]() |
सदिच्छा समारंभात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मा. अशोक शिरगुप्पे,प्रा. आप्पासाहेब भगाटे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले |
प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे शुक्रवार दिनांक २८ मार्च रोजी मानव्यविद्या शाखेचा सदिच्छा समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य व माजी मुख्याध्यापक मा.अशोक शिरगुप्पे, मा.प्रा.आप्पासाहेब भगाटे,प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व प्रा.डॉ. विजयमाला चौगुले उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे मा.अशोक शिरगुप्पे म्हणाले, आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर अनेक सोबती येत असतात व काळानुसार सोडून जात असतात. आपण वास्तव परिस्थितीचा स्वीकार करून विकासाची पुढची दिशा सकारात्मक भावनेने स्वीकारली पाहिजे. प्रा.आप्पासाहेब भगाटे म्हणाले, आयुष्य हे खाच-खळग्यांनी भरले असून येणाऱ्या चढ-उतारांना आनंदाने सामोरे जावे. तसेच खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला आज पासून सुरुवात झाली आहे याची जाणीव ठेवून ध्येय पूर्तीसाठी उत्तम कृतीचा आधार घ्यावा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे त्याचा मनोभावे पुरेपूर आनंद घ्यावा.
याप्रसंगी प्रा.डॉ. तुषार घाटगे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा सुकर मार्ग सांगितला.डॉ. वंदना देवकर यांनी स्थानिक व व्यावहारिक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न केला.
प्राचार्य डॉ.सुरत मांजरे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कॉलेजने आपणास तीन ते पाच वर्षात वर्तनवादी सुसंस्काराची, विवेकशीलतेची, कौशल्य विकासाची व ज्ञानाची शिदोरी बहाल केली आहे. याद्वारे आपणास एक सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक बनविण्यास कॉलेज नेहमीच कटीबद्ध होते व यापुढेही असणार आहे.आयुष्याच्या वाटेवर यश निश्चितीसाठी सदैव प्रयत्नशील राहणेबाबत आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी पेपर फिशपॉड व विनोदी खेळांचा आनंद घेतला. विशेष करून विद्यार्थ्यांना गिफ्ट प्रदान करण्यात आले. तसेच नाश्त्याची सोय करण्यात आली होती.
उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार प्रा.एस.बी. डफळापूरकर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले.या सदिच्छा समारंभ कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उत्तम व नेटके नियोजन मानव्यविद्या शाखेतील सर्व विषयाचे विभाग प्रमुख व प्राध्यापकांनी केले. यामध्ये प्रा.डॉ. विजयमाला चौगुले,प्रा.डॉ. तुषार घाटगे, प्रा. डॉ.सुपर्णा संसुद्धी, प्रा.डॉ. शशांक माने,डॉ. प्रभाकर माने,प्रा.संतोषकुमार डफळापूरकर, प्रा.डॉ. संदीप तापकीर,डॉ. वंदना देवकर, प्रा.डॉ.खंडेराव खळदकर, प्रा.डॉ. सुजाता पाटील, डॉ. प्रतिभा जावळे,प्रा. सुरज चौगुले,प्रा. किरण पाटील,प्रा.डॉ. राजेंद्र कोळी,प्रा. कविता चानकने, प्रा.राजाराम कांबळे, प्रा.अमर शिंदे, प्रा. मोहम्मद बागवान, प्रा. वर्षा चौगुले, प्रा. नवनाथ राठोड, प्रा. आनंदा परीट व प्रा. सुशांत तांदळे या सर्वांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा