Breaking

शनिवार, ८ मार्च, २०२५

"उदगाव येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 ज्ञान पूर्ण वातावरणात संपन्न"


शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.०


*प्रा.अंजना चौगुले-चावरे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर: डॉ. आप्पासाहेब साहेब उर्फ सा.रे. पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव, येथे आयोजित पाच दिवसीय प्रशिक्षण अतिशय ज्ञान पूर्ण, भावपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी शिरोळ तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेतून १५४ हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. काळानुसार होणारा शिक्षण पद्धतीतील बदल शिक्षकांनी समजावून घेणे हाच या प्रशिक्षणाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

   शिक्षक हा समाजाचा प्रतिनिधी असून समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचा संबंध असतो विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक असतात आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असते म्हणून असे प्रशिक्षण शासनामार्फत घेण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर विद्यार्थ्याला आनंददायी शिक्षण मिळाले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, शिक्षण हे आवडीचे झाले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचा विकास हा 360 डिग्रीत व्हायला पाहिजे हाच या नवीन शिक्षण प्रणालीचा उद्देश आहे ते या प्रशिक्षणातून अगदी सहजतेने स्पष्ट झाले. 

        या प्रशिक्षणासाठी खालील सुलभक(R.P) यांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती सांगून प्रश्न- उत्तर शैली द्वारे या प्रशिक्षणाचे खऱ्या अर्थाने मूल्यांकन केले.श्री किरण पाटील-समग्र प्रगती संकल्पना व पार्श्वभूमी स्तर निहाय स्वरूप,सौ गीताजे जे.एस.-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व शालेय शिक्षण 2024,श्री विष्णू सुतार-राज्य अभ्यासक्रम आराखडा व शालेय शिक्षण 2024, सौ दीप्ती पाटील-शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा,सौ अर्पिता चौगुले-शाळा गुणवत्ता मूल्यांकन क्षेत्र 1 ते 6 व विचार प्रवर्तक प्रश्न,श्री नितीन कोठेकर-क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना, श्री संजय नेजे -क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन मूल्यांकन,श्री पी. एन .मुलाणी -क्षमता आधारित अध्ययन -अध्यापन मूल्यांकन. या नऊ सुलभकांनी नवीन शिक्षण प्रणालीचा अध्ययन पूर्ण अवलोकन करून उत्कृष्ट मार्गदर्शना द्वारे प्रशिक्षणार्थी पर्यंत पोहचविले. शिरोळ तालुक्यातील या प्रशिक्षणाचा चौथा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. 

       या प्रशिक्षणासाठी गटशिक्षण अधिकारी सौ. भारती कोळी मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याचबरोबर शि.वि. श्री डी. एल कामत , श्री नारायण पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर अनिल ओमासे, केंद्रप्रमुख अण्णा मुंडे, जाधवर साहेब सौ अपर्णा मोकाशी, सौ.माने, श्री अनिल पवार श्री बरगाले, श्री नितीन कांबळे  यांचे सहकार्य लाभले. 

     प्रशिक्षणार्थीने सादर केलेल्या उत्साहपूर्ण अशा सांस्कृतिक कार्यक्रमाने या पाच दिवसीय प्रशिक्षणाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा