![]() |
व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. विजयमाला चौगुले, अध्यक्षस्थानी डॉ. खंडेराव खळदकर, प्रा. वर्षा चौगुले व अन्य मान्यवर |
प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : आधुनिक काळात यशस्वी होण्यासाठी केवळ माहिती, ज्ञान आणि कौशल्य पुरेसे नसून, यासाठी प्रभावी व तेजस्वी व्यक्तिमत्व असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.बहुश्रुत व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून भविष्यातील आव्हानांना सामोरे जात येते. यासाठी संतुलित व सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे असल्याचे मत उद्घाटक व उप प्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले यांनी अर्थशास्त्र पदव्युत्तर विभागाच्या वतीने आयोजित 'व्यक्तिमत्व विकास' या एक दिवशीय कार्यशाळेत प्रतिपादित केले. अध्यक्षस्थानी डॉ. खंडेराव खळदकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.
डॉ. चौगुले पुढे म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याच्या आंतरिक व बाह्य देहबोलीवरून स्पष्ट होत असते. याप्रसंगी त्यांनी व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे सविस्तर माहिती दिली.
प्रथम सत्रात प्रा. वर्षा चौगुले या प्रथम पुष्प गुंफताना म्हणाल्या, व्यक्तीचे परिपूर्ण व बहुश्रुत व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काही तांत्रिक व शास्त्रीय बाबींचा आधार घ्यावा लागतो. परिपूर्ण व्यक्तिमत्वासाठी दृढ आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा व दृष्टीकोन, वेळेचे व्यवस्थापन आणि भावनिक समतोल यांसारख्या अनेक घटकांची नितांत आवश्यकता असते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. खंडेराव खळदकर म्हणाले, व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे बऱ्या वाईट, प्राप्त परिस्थिती व अनुभवाच्या आधारे बनत असून याचं स्वरूप नेहमी बदलते असते.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा,मार्गदर्शन व सहकार्य लाभले डॉ.प्रभाकर माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.वंदना देवकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.स्वाती शिंदे यांनी केले. याप्रसंगी प्रा.विश्रांती चव्हाण,प्रा. मेहबूब मुजावर, प्रा. ज्योती पोरे व एम.ए.च्या विद्यार्थ्यांनी उत्तम नियोजन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा