Breaking

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

जयसिंगपूरची आदिती संजय चौगुले ; केंद्रीय लोकसेवा परीक्षेत ६३ वी रँकने चमकली


आदिती संजय चौगुले, जयसिंगपूर यूपीएससी परीक्षेत 63 वी रँक


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील कु.आदिती संजय चौगुले हिने देशभरात ६३ वी रँक घेवून युपीएससी परीक्षेत उज्वल यश मिळवलं आहे. यापूर्वी सन २०२३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ४३३ वी रँक प्राप्त करून घवघवीत यश मिळवलं होते.

    आदितीचे प्राथमिक शिक्षण कै.श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर, जयसिंगपूर, बारावी पर्यंतचे शिक्षण जनतारा विद्या मंदिर, जयसिंगपूर तर  सांगली वालचंद कॉलेज येथे तिने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यानंतर समाजशास्त्र विषयात उत्तीर्ण होवून युपीएससी परीक्षेची तयारी तिने सुरु केली होती. 

     केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी (मुख्य) परीक्षा २०२३ निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये तिने ६३ वी रँक घेवून यश संपादन केले. दुसऱ्या प्रयत्नात  तिने हे यश संपादन केले. 

    आई वडिलांची शुभाशीर्वाद व प्रेरणा, गुरुजनांचे  व सहकाऱ्यांचे लाभलेलं मार्गदर्शन, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व अभ्यासातील सातत्य यामुळे हे सुयश लाभली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

      तिच्या या राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल व सुयशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा