![]() |
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,प्रा. सुरज गिरमल व सर्व निवड झालेले विद्यार्थी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मधील बी.व्होक. ऑटोमोबाईल अँड प्रिंटिंग या विभागातील ३२ विद्यार्थ्यांची देश विदेशातील विविध अग्रगण्य कंपन्यांमध्ये प्लेसमेंट द्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
शासकीय मुद्रणालय, नाशिक, राजकुमार बारस्कॅन, पी.सी.टी लिमिटेड, मुंबई, श्री गणेश ग्राफिक्स मुंबई, क्रिएटिव्ह पॅकेजिग, टांझानिया- ईस्ट आफ्रिका, श्री गणेश ग्राफिक्स मुंबई, हुतामांकी इंडिया लिमिटेड तळोजा मुंबई, मर्सिडीज बेंज पुणे, माई हुंडाई- सांगली, राजहंस होंडा इचलकरंजी व ट्रू व्हॅल्यू सांगली यासारख्या प्रसिद्ध कंपन्यामध्ये निवड झाली आहे. या विभागाच्या अभिनव व नाविन्यपूर्ण प्रशिक्षण तंत्र प्रणालीद्वारे या विद्यार्थ्यांना हे यश लाभले आहे.
संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, अन्य पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच समन्वयक डॉ.पी.पी. चिकोडे, विभाग प्रमुख प्रा. सुरज गिरमल, प्रा. प्रज्ञा लंबे व प्रा.आरती गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा