Breaking

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

*इचलकरंजीचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसेचे निलंबन*

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे निलंबित


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


इचलकरंजी : येथील गावभाग पोलिस ठाण्यात वादग्रस्त महिलांमध्ये झालेल्या गोंधळ प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे गावभाग पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांना निलंबित करण्यात आले. प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-  पाटील यांनी याबाबतचा आदेश जारी केला.

    अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आलेल्या काही महिलांमध्ये जोरदार बाचाबाची केली. ठाण्यातच एकमेकांना शिवीगाळ करत आरडाओरड केली. तसेच हातघाईवरही उतरत दंगा घातला. या प्रकारामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी पोलिस निरीक्षक महेश चव्हाण मासिक गुन्हे बैठकीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले होते. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे हे ठाण्यात उपस्थित असूनही त्यांनी या वादात तत्काळ सहभाग घेतला नाही. तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. या गंभीर दुर्लक्षामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा