![]() |
पाणी बचतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. प्रभाकर माने, अध्यक्षस्थानी उप प्राचार्य डॉ. विजयमाला चौगुले, ग्रीन क्लब समन्वयक डॉ. वंदना देवकर व डॉ. कविता चानकने |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये ग्रीन क्लब च्या वतीने जागतिक जल दिनाचे औचित्य व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक २१ एप्रिल, २०२५ रोजी जयसिंगपूर कॉलेज कॅम्पस मध्ये व्याख्यान व रॅलीचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख वक्ते डॉ. प्रभाकर माने मार्गदर्शन करताना म्हणाले, समुद्राला वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून कॅनल द्वारे इतर हंगामी नद्यांना जोडून त्या बारमाही बनवता येते. परिणाम स्वरूप सर्व भाग सुजलाम व सुफलाम होऊ शकतो. तसेच प्रदूषित असणाऱ्या नद्या व अन्य जलसाठे जाणीवपूर्वक सुरक्षित करण्यासाठी सर्व पातळीवर उत्तम व्यवस्था करणे गरजेचे आहे. यासाठी राजकीय कृतिशील इच्छाशक्ती असली पाहिजे याबाबत त्यांनी सकल विवेचन केलं.
उपप्राचार्य प्रा.डॉ. विजयमाला चौगुले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, पाणी हे जीवन असून त्याचा पर्याप्त वापर करणे काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येक घटकाने जाणीवपूर्वक पाण्याची काटकसर करावी. यासाठी काही व्यावहारिक उदाहरण देऊन उपस्थितांना पटवून दिले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली आणि वर्षभर पाणी काटकसरीने वापरण्याचा व वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार केला. जल है तो कल हैl बाकी सब फेल है l आणि ‘पाणी वाचवा – भविष्य वाचवा’ या सारख्या जलसंवर्धनाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
ग्रीन क्लब चे समन्वयक डॉ. वंदना देवकर यांनी स्वागत करून प्रास्ताविके च्या माध्यमातून पाणी सुरक्षितता व स्वच्छ पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. कविता चानकने यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा चौगुले यांनी केले.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.या कार्यक्रमास प्राध्यापक व ग्रीन क्लबचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा