Breaking

बुधवार, १६ एप्रिल, २०२५

*सांगलीत भिडे गुरुजींना कुत्र्याचा चावा ; रुग्णालयात दाखल*


श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मा.संभाजी भिडे गुरुजी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


सांगली : येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अर्थात संभाजी भिडे गुरुजी यांना सोमवार दिनांक १४ एप्रिल,२०२५ रोजी रात्री मोकाट कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर तातडीने रूग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. 

    अधिकृत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भिडे गुरुजी हे काल दिनांक १४ रोजी रात्री माळी गल्लीतील एका धारकऱ्यांच्या घरी भेटीसाठी गेले होते. ते पुन्हा निवासस्थानी परतत असताना मोकाट कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला.त्यावेळी धारकऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले.सदर घटना समजताच भिडे यांच्या निवासस्थानी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी असंख्य धारकरी जमा झाले होते.

  या घटनेनंतर शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा