Breaking

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

*जयसिंगपूरच्या डॉ. जे. जे. मगदूम इंजीनियरिंग कॉलेजमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन*


चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, डॉ. जे. जे मगदूम ट्रस्ट


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


  जयसिंगपूर : येथील  डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्रस्ट अंतर्गत डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जयसिंगपूर व नामवंत कंपन्यांच्या मदतीने रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख उपस्थिती म्हणून मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मा.ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास महामंडळ व ॲड. डॉ. सोनाली मगदूम, सचिव तथा उपाध्यक्षा डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्ट जयसिंगपूर. आमंत्रित आहेत अशी माहिती कॅम्पस डॉ. डायरेक्टर सुनील आडमुठे यांनी दिली.

       बेरोजगारांना नोकरीच्या संधी देण्याचे काम डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट सातत्याने करीत आहे, तसाच उपक्रम सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व युवकांच्यासाठी राबविण्याचा आमचा मानस असून,ऑप्टिमा जॉब्स, फिनिक्स इन्फोटेक व युवाशक्ती प्रतिष्ठान सहभागी आहेत.७०० हून अधिक गरजवंतांना नामांकित ५० हून अधिक कंपन्या द्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मनोदय आहे असे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद यांनी सांगितले.

            या जॉब फेअर मध्ये  १० वी, १२वी, आय. टी. आय, वैद्यकीय, अभियांत्रिकी   पदवी व पदव्युत्तर फ्रेशर्स व अनुभवी उमेदवार सहभाग नोंदवू शकतात. इच्छुकांनी २० एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वा. डॉ. जे जे. अभियांत्रिकी महाविद्यालय जयसिंगपूर  येथे उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. पी.पी. माळगे यांनी आवाहन  केले आहे. अधिक माहितीसाठी ९८६०९१९१२४,७५५९२७२२०७ व ९९२३९६८२६२ या मोबाईल वरती संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा