![]() |
जयसिंगपूरच्या क्रांती फाउंडेशनचे रक्तदान शिबिर संपन्न |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील लोकप्रिय क्रांती फौंडेशनच्या वतीने १ मे,२०२५ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १३३७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे रक्तदान करून खऱ्या अर्थाने रक्तदाना च्या माध्यमातून महोत्सव उत्साहात साजरा केला. या शिबिरास युवक, सामाजिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते विशेष करून युवती व महिलांचा विशेष सहभाग होता. शिबिरासाठी विविध ब्लड बँक' च्या चमूने आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.
यावेळी अनेक मान्यवरांनी हे रक्तदान गरजू रुग्णांसाठी अमूल्य असून देश व समाजाची सेवा करण्याची नामी संधी या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याचे मत व्यक्त केले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला.
क्रांती फौंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवळपास २ महिन्यापासून हे शिबिर यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. यासाठी त्यांनी जयसिंगपूर शहर व परिसरातील तरुण मंडळ व नागरिकांचे ग्रुपचे व्यवस्थितरित्या नियोजन करून प्रचंड परिश्रम घेतले. क्रांती फौंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये असलेला उत्तम संवादाच्या माध्यमातून हे शिबिर यशस्वीपणे पूर्ण केले.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन, जात-पात व धर्माच्या पलीकडे जाऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी युवकांच्या मध्ये केलेली जागृती, सर्व स्तरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद, उत्तम नियोजन व व्यवस्थापनाच्या माध्यमातून यशस्वी झालेले शिबिर, क्रांती फौंडेशनबद्दल लोकांची असणारे आस्था व प्रेम प्रकर्षाने दिसून येत होते. या पूर्वी ही सामाजिक भान जपणाऱ्या या क्रांती फौंडेशनने रक्तदानाचे अनेक यशस्वी शिबिराचे आयोजन केले आहे.
यापुढेही रक्तदानाचा महोत्सव आयोजित करून जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करण्याचा क्रांती फौंडेशनच्या मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा