![]() |
डॉ.जे.जे.मगदूम होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. सॅम्युएल हँनिमन यांची २७० वी जयंती साजरी |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. सॅम्युएल हँनिमन यांची २७० वी जयंती व जागतिक होमिओपॅथी दिनाचे औचित्य साधून 'क्लासिकल होमिओपॅथी ' या विषयावरती एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राहुल जाधव उपस्थित होते.
क्लासिकल होमिओपॅथी आणि संशोधन या संकल्पनेवर आधारित प्रस्तुत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर राहुल जाधव व डॉक्टर धनश्री जाधव यांच्या उपस्थितीत क्लासिकल होमिओपॅथीच्या आधारे उपचार केलेले केसेस दाखवून विशेष मार्गदर्शन केले. पदवी व पदव्युत्तर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. हँनिमन . डॉ. जे. जे. मगदूम व डॉ. प्रभा जे. मगदूम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हाईसचेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील बन्ने, उपप्राचार्या डॉ. आरती कोगनोळे व डॉ. गजाला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अंगराज माने, ऐश्वर्या गुरव, आरती जरळी, माधुरी पाटील, प्रियंका पवार यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
डॉ.प्रणव निमणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, सूत्रसंचालन डॉ. स्नेहा जोगदंडे तर आभार डॉ. सरोज सावंत यांनी मांनले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा