![]() |
मयत सरताजभाई पेंढारी, जयसिंगपूर |
जयसिंगपूर : येथील स्वाभिमानी पतसंस्थेजवळील इमारतीच्या गॅलरीत चक्कर आल्याने तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे.मयत इसमाचे नाव सरताजभाई पेंढारी (वय वर्ष ४२) असून ते चिकन ६५ चा व्यवसाय करीत होते.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली कोल्हापूर मार्गावरील स्वाभिमानी पतसंस्था जवळ सदरची घटना घडली. मयत पेंढारी यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.
पेंढारी यांचा मृत्यू झाल्याचे समजतात त्यांचे मित्र व नातेवाईक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ गर्दी केली होती. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत पेंढारी यांच्या पश्चात एक ९ वर्षाचा मुलगा व पत्नी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा