![]() |
दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त शपथ ग्रहण करताना कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात आला.हा दिन पाळण्यामागे जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचविणे, देशासाठी व दहशतवादाविरोधात लढणाऱ्या सैनिकांच्या त्याग व बलिदानाचा सन्मान करणे हा हेतू आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील लॉनमध्ये दहशतवाद व हिंसाचारविरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ.धनंजय सुतार, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ.शरद बनसोडे, उपकुलसचिव श्रीमती संध्या अडसुळे, अजित चौगुले, डॉ.राजेंद्र रायकर, सुरक्षा अधिकारी वसंत एकले आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ.तानाजी चौगले यांनी सर्वांना शपथ दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा