Breaking

गुरुवार, २२ मे, २०२५

*शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर येथे घरफोडी*


संभाजीपुरातt (ता.शिरोळ)चोरी

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


शिरोळ : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे मनी मंगळसूत्र व रोख ४ हजार रुपये असा २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

     अधिकृत सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संभाजीपूर येथील रवी रमेश कांबळे हे घराला कुलूप घालून परगावी गेले होते. १६ ते २० मे च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कडी कोयंडे तोडून, घरातील मनी मंगळसूत्रासह २९ हजार रुपयांचा ऐवज पळविल्याची फिर्याद शिरोळ पोलिस ठाण्यात दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा