Breaking

शुक्रवार, २३ मे, २०२५

*आदिती चौगुले यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते विशेष सत्कार*


माजी खासदार राजू शेट्टी यांचे हस्ते कु.आदिती संजय चौगुले यांचा सत्कार  व या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर  व एकलव्य करिअर अकॅडमी, जयसिंगपूर आयोजित विशेष सत्कार कार्यक्रम गुरुवार दिनांक २२ मे रोजी कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये  आयोजित करण्यात आला होता. आय.ए.एस. परीक्षेत देशात ६३ वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कु.आदिती संजय चौगुले यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला.

        याप्रसंगी आदिती चौगुले  यांनी स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक सांगून  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व मनोधैर्य त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून वाढवले. माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करताना म्हणाले,एकलव्य करिअर अकॅडमी ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल, होतकरू, विशेष करून महिलांसाठी करिअरचे एक हक्काचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी आदिती चौगुले यांच्यासारखे सुयश या केंद्राच्या माध्यमातून मिळवण्याबाबतची अपेक्षा त्यानिमित्ताने व्यक्त केली.

    डॉ. महावीर अक्कोळे यांनी स्वागत  व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय अमोल चौगुले यांनी केले.प्रा.डॉ.तुषार घाटगे यांनी आभार मानले.प्रा.डॉ. सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

       या कार्यक्रमास संस्थेचे सदस्य अशोक शिरगुप्पे,प्रा.अप्पासाहेब भगाटे,ॲड.आदिनाथ नरदे, शैलेश चौगुले,अभिजीत अडदंडे, निखिल इंगळे, एकलव्य करिअर अकॅडमीचे विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा