Breaking

शनिवार, २४ मे, २०२५

*ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विजय ककडे यांची अर्थसाक्षरतेसाठी निवड*

 

ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ. विजय ककडे, कोल्हापूर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विभागाचे माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. विजय ककडे यांची बीएसइ तर्फे अर्थसाक्षरते साठी सेबी नामिका तज्ञ म्हणून निवड झाली आहे. ते सेबीचे तज्ञ नामिका पात्र असून सीडीएसएलच्या गुंतवणूक मार्गदर्शन तसेच वित्त नियोजन यामध्ये साधन व्यक्ती म्हणून ते कार्यरत आहेत. बीएसइ तर्फे महाविद्यालय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला कर्मचाऱ्यांना मोफत अर्थ साक्षरतेची माहिती दिली जाते. त्यामध्ये फसव्या आर्थिक योजना पासून सावधानता, मोबाईल मार्फत फसवणूक गुंतवणुकीचा उत्तम पर्याय याबाबत माहिती दिली जाते. राष्ट्रीय गुंतवणूक जागरूकता आणि सुरक्षा योजनेअंतर्गत ही मोफत व्याख्याने त्यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात दिली जात आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व अन्य मान्यवर व्यक्तीने त्यांचे अभिनंदन केले.

     डॉ. विजय ककडे यांनी यापूर्वी प्राचार्य म्हणून अर्थात प्रशासक म्हणून कामकाज पाहिले आहे. विविध विषयावर अभ्यास व अर्थपूर्ण व्याख्याने  त्यांनी दिली आहेत. अर्थशास्त्र विषयातील तज्ञ व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते पश्चिम महाराष्ट्रात परिचयाचे आहेत. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात अर्थसाक्षरतेसाठी केलेले प्रबोधनात्मक कार्य हे त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा पैलू दिसून येतो. संशोधनात्मक पातळीवर गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी सातत्याने झटणारे व कार्यरत असणारे ज्येष्ठ संशोधक म्हणून ते कार्यमग्न आहेत. असंख्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली पीएच.डी. व एम. फिल.पदवी संपादन केली आहे. आधुनिकता व तंत्रज्ञानाची कास धरून अर्थशास्त्राच्या विविध ज्ञान शाखेना स्पर्श करणारे बहुश्रुत व्यक्तिमत्त्वाचे प्राध्यापक म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो. समाजवादी प्रबोधीनीच्या अभ्यास गटाचे तज्ञ म्हणून ते ३२ वर्षापासून कार्यरत आहेत.अंदाजपत्रक व अभ्यासपूर्ण लेख व व्याख्यान हे त्याचं तीन दशकापासून विविध वित्तीय संस्थेची नाळ जोडली आहे. सुयकचे माजी अध्यक्ष, विद्यापीठ व महाविद्यालयीन पातळीवर शैक्षणिक समित्यावर कार्य केले आहे.अभ्यासपूर्ण व्याख्याने,तज्ञ साधन व्यक्ती, विविध वृत्तपत्रातून त्यांचे अभ्यासपूर्ण व  अर्थकारणावर भाष्य करणारे लेख हे वाचकांसाठी वैचारिक शिदोरी निर्माण करतात. कृषी, औद्योगिक, श्रमाचे अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त व पर्यावरणीय अर्थशास्त्रावर त्यांची पाठ्यपुस्तक व संदर्भीय ग्रंथ निर्मिती केली आहे.डॉ.ककडे अनेक शैक्षणिक,सामाजिक व वित्तीय संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहेत.

        डॉ. विजय ककडे यांच्या या निवडीने सुयेक परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जय हिंद न्यूज नेटवर्क परिवारातर्फे गुरुवर्य डॉ. ककडे यांचे अभिनंदन  करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा