Breaking

शुक्रवार, २३ मे, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजच्या प्रा.सौ. अंजना संजय चावरे-चौगुले आदर्श हिंदी शिक्षक पुरस्काराने सन्मानित*


हिंदी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त प्रा.अंजना संजय चावरे-चौगुले


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर :  शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार सत्यजित तांबे ( पदवीधर मतदार संघ नाशिक) यांच्या हस्ते प्रा.सौ.अंजना चावरे यांना प्रदान करण्यात आला.

     अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघाची दोन दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी हा पुरस्कार देण्यात आला आहे या सोहळ्यासाठी साहेबराव घाडगे पाटील (मा.उपायुक्त मनपा ,मुंबई, संस्थापक अध्यक्ष त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान) मा. मिलिंद कांबळे (अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ), रेवणनाथ कर्डिले (सचिव-महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ) तसेच  महाराष्ट्रातील नऊ विभागातून आलेले सर्व हिंदी अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघाकडून मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, संस्थेचे सन्माननीय सदस्य, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, कार्यालयीन अधीक्षक ए.बी.कांबळे व संजय चावरे , सीनियर व ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक व कर्मचारी व विशेष करून विद्यार्थ्यांनी त्यांचं मनस्वी अभिनंदन केले.

     प्रा.सौ.अंजना चावरे-चौगुले या उत्तम लेखिका, संवेदनशील साहित्यिक, ओजस्वी व मधुर वाणीने सूत्रसंचालन करणाऱ्या उत्तम निवेदिका, प्रेरक वक्ते, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या संघर्षशील व प्रयोगशल प्राध्यापिका, सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सातत्याने संधी देऊन त्यांच्यात रममाण होणाऱ्या कला शिक्षका, विविध सामाजिक व शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या बहुश्रुत व्यक्तिमत्त्वाच्या शिक्षिका म्हणून त्यांचा नामोल्लेख होत असतो.

  या यापूर्वीही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पुरस्कारानी सन्मानित झाले आहेत. प्राप्त झालेल्या पुरस्काराने प्रा.सौ.अंजना संजय चावरे-चौगुले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा