Breaking

शुक्रवार, २३ मे, २०२५

*योगेशकुमार गुप्ता कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक*


नूतन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, कोल्हापूर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : गृह विभागातर्फे काढण्यात आलेल्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त पदी बदली झाली. योगेशकुमार गुप्ता यांची कोल्हापूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. आज शुक्रवार दिनांक.२३ मे ,२०२५ रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. 

       योगेशकुमार गुप्ता हे मूळचे पंजाबचे असून २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्याची नांदेड, वसई, हिंगोली, मुंबईमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. ते सध्या नांदेड नागरी हक्क संरक्षण चे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नागरिकांची सुसंवाद हा त्यांच्या उत्तम कार्यशैलीचा हातखंडा आहे. नियुक्तीचा आदेश मिळताच ते कोल्हापूर साठी रवाना झाले आहेत.

   स्थानिक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्याकडून प्रभावी नेतृत्वाची अपेक्षा आहे. त्यांचा पूर्वीचा अनुभव आणि कार्यक्षमता कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा