Breaking

शनिवार, ३ मे, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा*


१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये १ मे अर्थात महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी राज्यभाषा दिन उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुरज मांजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रगीत, राज्य गीत व झेंडा गीत यांचे सामूहिक गायन करण्यात आले. 

       यावेळी प्राचार्य डॉ. मांजरे यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सविस्तर इतिहास मांडला. प्रा. सुनील चौगुले यांनी कामगार दिन व राज्यभाषा दिन याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ. विजयमाला चौगुले, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, कार्यालयीन अधीक्षक मा. ए. बी.कांबळे, मुख्याध्यापिका मा. प्रिया गारोळे , एन.सी.सी. ऑफिसर लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, प्राध्यापक वृंद, अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक वर्ग, प्रशासकीय सेवक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा