![]() |
आर्टस शाखेत कु. आर्या कांबळे व कॉमर्स शाखेत कु.तन्मय कोळी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज मध्ये एच.एस.सी बोर्ड फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत जयसिंगपूर केंद्रात आर्ट्स व कॉमर्स विभागात जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर प्रथम स्थानी असून शाखानिहाय आर्ट्स मधून कु.आर्या परशराम कांबळे ८२ % व कॉमर्स विभागातून कु. तन्मय रविंद्र कोळी ८४.५०% गुण मिळवून केंद्रात अव्वल स्थान पटकाविले आहे.
आर्ट्स विभागात कु.साक्षी प्रदीप पुजारी ७८.५०% व कु.आकांक्षा अजित तकडे ७५.८३% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. तर कॉमर्स विभागात कु. स्वरूपा रविंद्र पाटील ८१.६७% व कु. गौरव आनंद पाटील ८०.६७% द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. सायन्समध्ये प्रथम कु.प्रतिक्षा प्रदीप खोत ८०%, कु.पार्थ संताजी कदम ७२.५०%(द्वितीय) तर कु.यश श्रीकांत निकम ७२% (तृतीय)क्रमांक मिळविला आहे.
कॉलेजच्या आर्ट्स विभागाचा निकाल ८०.१९%, कॉमर्स विभागाचा निकाल ९३.३३% व सायन्स विभागाचा निकाल ९८.२१% आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे, मा. पद्माकर पाटील,सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर,पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, कार्यालयीन अधीक्षक मा.ए.बी. कांबळे,समस्त शिक्षक व प्रशासकीय सेवक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा