![]() |
शिरोळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हरवलेल्या बालिकेला शोधून पालकांकडे सुपूर्द केले. |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
शिरोळ : शिरोळ पोलीस ठाण्याच्या कार्य तत्परतेमुळे हरवलेल्या तीन वर्षाच्या बालिकेला शोधून आई-वडिलांच्याकडे सुपूर्त करण्यात शिरोळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, प्रकाश मनोहर मांजरेकर (वय वर्ष ४५) पेशाने शिक्षक असून त्याची पत्नी सौ राजेश्वरी प्रकाश मांजरेकर (वय वर्ष ३९) यांचे समवेत त्यांची मुलगी नुविका प्रकाश मांजरेकर (वय वर्ष ३) रा.मुंबई हे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते.दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तिच्या आई-वडिलांनी मुलगी कु. नुविका हिला नृसिंहवाडी येथे विसरून चार चाकी वाहनातून खिद्रापूर येथे देवदर्शना करीता गेले होते. दरम्यानच्या काळात मुलगी कुठे दिसत नाही हे लक्षात आल्यानंतर तिची शोधाशोध करत असताना त्यांच्या लक्षात आले की, मुलगी नृसिंहवाडी परिसरात हरविली आहे. या दांपत्याने तातडीने शिरोळ पोलीस ठाणेश संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली.
शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा पटेल व हक्के, पोलीस कॉन्स्टेबल खराडे, पोलीस मित्र शरद सुतार व देवस्थान कर्मचारी अभिजीत शिंदे यांनी तात्काळ शोधाशोध केली असता सदर मुलगी कु. नुविका प्रकाश मांजरेकर हिला शोधून तिच्या पालकांशी संपर्क साधून ताब्यात दिले.
शिरोळ पोलीस ठाण्याच्या कार्यतत्परतेमुळे सदर मुलगी तिच्या पालकांकडे सुखरूप पोहोचली. या कामी शिरोळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा